मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील अर्जामध्ये छाननी प्रक्रियेत त्रुटी असतील तर त्या दूर करू : आ. राम शिंदे 

Google search engine

 

कर्जत तालुक्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत अर्ज दाखल केले आहेत . छाननी प्रकियेत त्यामधील काही अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या असल्याने संबंधित विभागाकडून त्यांना तसे कळविणेत आलेने त्यांची अस्वस्थता वाढली आहे परंतु ते तात्पुरते नामंजुर आहेत त्यातील त्रुटी दूर करू असे प्रतिपादन आ प्रा राम शिंदे यांनी केले आहे .

कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे एकूण ३८ हजार १४२ अर्ज लाभार्थी महिलांकडून प्राप्त झाले असून यापैकी छाननी प्रकियेत अर्ज अपूर्ण भरणे, त्रुटी असणे, कागदपत्रांची अपूर्णतता असणे या कारणाने २३३६ अर्ज अंशतः / तात्पुरते नामंजूर करण्यात आले असल्याचे संदेश शासन प्रणालीकडून मिळाल्याने लाभार्थी महिला अस्वस्थ झाले आहेत. त्रुटी संदर्भात त्यांनी आ .राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयास संपर्क करावा .

महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आर्थिक सक्षमता वाढवणे, आरोग्य, पोषण यामध्ये महिलाना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे, आर्थिक सक्षमतेमुळे कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत मध्यवर्ती भूमिका बजावता येईल या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस सुरुवात केली असून लाभार्थी महिलेस दरमहा दीड हजार रुपये अनुदान मिळणार आहे. कर्जत तालुक्यात आजमितीस ३८ हजार १४२ अर्ज प्राप्त झाले. सदरच्या अर्जाची छाननी प्रक्रिया शासनाकडून सुरू झाली असून ज्यांचे अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह दाखल करण्यात आले. त्यांना लाभार्थी म्हणून संदेश प्राप्त झाले.अर्ज छाननी प्रक्रियेत ज्या लाभार्थ्यांनी संपूर्ण अर्ज भरला पण तो लाभासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची कमतरता असणे, आधारकार्ड किंवा बँक पासबुक नावात बदल असणे किंवा हमीपत्रावर अर्धवट सही यासह काही रकाने मोकळे सोडणे यामुळे नामंजूर झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र त्यांना पुन्हा एकदा त्रुटी निघालेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधी मिळणार असून त्यावेळी योग्य सर्व माहिती अचूक भरून व योग्य यंत्रणेकडेच तो ऑनलाइन सबमिट करावा असे आवाहन आ .राम शिंदे यांनी केले आहे.

चौकट :-

काही राजकीय पक्षांना ही योजना यशस्वी होऊ द्यायची नाही म्हणून त्यांनीही या योजनेचे अर्ज महिलांकडून भरून घेतले परंतु त्यामध्ये त्रुटी आढळून येत आहेत त्यामुळे महिला भगिनी या लाभापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला होता परंतु वेळीच हस्तक्षेप केल्याने महिला भगिनीचे नुकसान टळणार आहे त्यामुळे आता तरी योग्य यंत्रणेमार्फतच अर्ज करावेत . मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण विधानसभा क्षेत्रीय समितीच्या अध्यक्षपदी आ.राम शिंदे यांची निवड झाल्यामुळे महिला भगिनींना न्याय मिळेल असा विश्वास आहे .

शेखर खरमरे तालुकाध्यक्ष, भाजपा कर्जत .