दादा पाटील महाविद्यालयाचे १० विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण 

Google search engine

उच्च महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी पदव्युत्तर पदवी बरोबरच सेट किंवा नेट ही परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यावश्यक असते.

एप्रिलमध्ये झालेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून दादा पाटील महाविद्यालयातील विविध विषयाचे दहा विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये अतुल बाबर (अर्थशास्त्र), तेजस सरोदे, निखिल बांदल (प्राणीशास्त्र), अक्षय खाळगे, माधुरी पानसरे (रसायनशास्त्र), मनीषा उकिरडे (वनस्पतीशास्त्र), उमेश निंबाळकर, ऐश्वर्या नलवडे (गणित), अदिती अगावणे, सहदेव कानगुडे (भौतिकशास्त्र) हे महाविद्यालयातील माजी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. महाविद्यालयामध्ये नेट – सेट परीक्षा तयारी करून घेण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाचे मार्गदर्शन वर्ग घेतले जातात. त्यासाठी विविध विषयांकरिता तज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित केली जातात. डॉ. संजय नगरकर यांनी अंमलात आणलेल्या प्रति वर्ष तीन महिन्याच्या नेट सेट मार्गदर्शन वर्गाचा फायदा सदर विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. सदर वर्गाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. अशोक म्हस्के हे काम पाहतात.महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या व सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघ, सर्व विषयांचे विभाग प्रमुख, उपप्राचार्य तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.