
लाखो वैष्णव , श्रद्धेने घरदार सोडून विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर पायी जातात .महाराष्ट्राला साधुसंतांची फार मोठी परंपरा तसेच संस्कृती लाभली आहे. तो वारसा जतन करण्यासाठी ,आमच्या विद्यालयातील लहान – सहान मुलांनी दिंडीचे नियोजन केले, असे प्रतिपादन नूतन मराठी विद्यालयाचे प्राचार्य सूर्यभान सुद्रिक यांनी केले.
कुळधरण येथील, नूतन मराठी विद्यालयातील शिक्षकांनी मुलांची वेशभूषा ,भजनं, अनेक प्रकारचे संगीत नृत्य घेऊन दिंडीची पूर्ण तयारी करण्याचे परिश्रम घेतले.,” जय जय राम कृष्ण हरी” या नाम घोषात विद्यालयातून दिंडीचे प्रस्थान झाले .पूर्ण गावातून दिंडी जात असताना ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले. गावातील धोंडीराज महाराज मठामध्ये जाऊन दर्शन घेऊन, परत दिंडी श्री जगदंबा मंदिरासमोर आली. त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचं संगीत नृत्ये झाली. उदाहरणार्थ माऊली माऊली .अनेक मुली फुगडी खेळल्या .या दिंडीसाठी विशेष सहकार्य पर्यावरण प्रेमी आबाश्री अशोक महाराज कुळधरणकर यांच्या उत्कृष्ट गायनाचे लाभलं, तसेच त्यांच्या समवेत शैला जगताप ,दादा लहाडे यांनीही उत्कृष्ट गायन केले तर राजेंद्र लोखंडे यांनी मृदुगांची साथ दिली .
गावातील लोकांनी विद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांना शिरा- पोह्यांचा महाप्रसाद दिला .त्याबद्दल विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश तोरकड यांनी सर्वांचे आभार मानले.






