

शंभु ऑईल मिलच्या यशस्वी वाटचाली नंतर कर्जत शहरात तनपुरे सुपर मार्केट , कुळधरण रोड , कर्जत व शंभु ऑइल इंडस्ट्रीचे ऑल वन १८ प्रकारचे मसाले अशा अत्याधुनिक मसाले व चहा पावडर , पळसवाडा रोड येथे शंभू मसाले या आपल्या रथ उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच ३१ जुलै २०२४ पासुन सुरू होणार आहे. शंभु ऑइल मिल (लाकडी घाणा तेल ) येथे दैंनदिन जीवनात लागणारे सेंद्रीय गूळ , हळद , सर्व प्रकारच्या डाळी व आता घरगुती मसाले , नॉन पॉलिश तांदूळ इत्यादी साहित्य कुळधरण रोड , कर्जत तनपुरे सुपर मार्केट येथे मिळणार आहे असल्याची माहिती शंभू ऑइल मिलच्या संचालिका सौ. ज्योती किशोर तनपुरे यांनी दिली.
गुणवत्ता पूर्ण लाकडी घाणा तेल व डाळींसाठी कर्जत तालुक्यात विश्वासदर्शता लाभलेले शंभु ऑइल मिल ब्रँड चे सर्वच प्रोडॉक्ट योग्य गुणवत्ता घेऊन उतरतील हा विश्वास संचालिका तनपुरे यांनी बोलून दाखवला . 
येत्या ३१ जुलै २०२४ रोजी सर्व प्रकारचे मसाले मिल उद्योग प्रक्रिया सुरू होणार असून समस्त कर्जत करांनी जो विश्वास दाखवला , तो येणाऱ्या काळात आशीर्वाद , प्रेम रुपी दाखवावा असे आवाहन शंभु ऑइल मिलच्या संचालिका सौ. तनपुरे यांनी केले आहे .






