भिगवन येथे ‘सिद्धिविनायक व्हील अलायमेंट & टायर्स’ची गेल्या 6 वर्षांपासूनची अत्याधुनिक विश्वासू सेवा भिगवण , इंदापूर, कर्जत परिसरातील वाहनधारकांसाठी एकाच ठिकाणी परिपूर्ण टायर व अलायमेंट सुविधा

Google search engine

 

भिगवन, कर्जत, इंदापूर सह परिसरातील वाहनधारकांसाठी पुणे–सोलापूर महामार्गावर मल्लिकनाथ मठा शेजारी ‘सिद्धिविनायक व्हील अलायमेंट & टायर्स’ हे सर्व सुविधा युक्त आणि अत्याधुनिक सेवा केंद्र एक नामांकित सेवा केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. गेली सहा वर्ष येथे चारचाकी व इतर वाहनांसाठी सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार टायर्स तसेच अत्यंत अचूक व आधुनिक व्हील अलायमेंट सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

वाहन चालवताना स्टेअरिंग ओढणे, टायर्स लवकर झिजणे, मायलेज कमी होणे किंवा ड्रायव्हिंग करताना स्थिरता न राहणे अशा समस्या अनेक वाहनधारकांना भेडसावत असतात. या सर्व समस्यांवर एकच प्रभावी उपाय म्हणजे योग्य व अचूक व्हील अलायमेंट. याच दृष्टीने ‘सिद्धिविनायक व्हील अलायमेंट & टायर्स’मध्ये JOHNBEAN PYRAMID 3D अ‍ॅडव्हान्स व्हील अलायमेंट मशीन बसवण्यात आले असून, आधुनिक 3D टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने अत्यंत परफेक्ट व विश्वासार्ह अलायमेंट सेवा दिली जाते.

योग्य व्हील अलायमेंटमुळे वाहनाची स्थिरता वाढते, टायर्सचे आयुष्य लक्षणीयरीत्या वाढते, इंधन कार्यक्षमता सुधारते तसेच ड्रायव्हिंग अधिक स्मूथ आणि सुरक्षित होते. परिणामी वाहनधारकांचा अनावश्यक खर्च टळून प्रवास अधिक सुखद व नियंत्रित होतो. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

या केंद्रावर योकोहामा, अपोलो, ब्रिजस्टोन, J. K. TYRE, CEAT यांसारख्या नामांकित कंपन्यांचे टायर्स वाजवी दरात उपलब्ध असून, ग्राहकांच्या गरजेनुसार योग्य मार्गदर्शनही केले जाते. दर्जेदार सेवा, आधुनिक यंत्रसामग्री आणि अनुभवी कर्मचारी ही या केंद्राची खास ओळख आहे.

वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी वेळोवेळी व्हील अलायमेंट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे परिसरातील सर्व वाहनधारकांनी ‘सिद्धिविनायक व्हील अलायमेंट & टायर्स’ या केंद्राला भेट देऊन या अत्याधुनिक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क : ७७५७९३९३५३ / ९५७९४३५०५२

पत्ता : मल्लिकनाथ मठा शेजारी, पुणे–सोलापूर हायवे, भिगवन, ता. इंदापूर