
सामाजिक, व्यावसायिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले मा. श्रीकांत (भैय्या) सायकर यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या वृंदावन लॉज & कॉम्पलेक्स तसेच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या भुमीपूजन समारंभाचे आयोजन सोमवार दि. 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता करण्यात आले आहे.हा भुमीपूजन समारंभ राशीन–भिगवण रोड, चौकीचा लिंब, वृंदावन हॉटेल शेजारी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथे संपन्न होणार असून, या कार्यक्रमाला परिसरातील विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक व सायकर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
वृंदावन लॉज & कॉम्पलेक्स हे भविष्यात प्रवासी, व्यापारी, कार्यक्रमासाठी येणारे पाहुणे तसेच स्थानिक नागरिकांसाठी सोयीस्कर व आधुनिक सुविधा देणारे केंद्र ठरणार आहे. यासोबतच श्रीकांत भैय्या सायकर यांचे जनसंपर्क कार्यालय हे सामान्य नागरिकांच्या प्रश्न, समस्या, सूचना व विकासात्मक कामांसाठी खुले व्यासपीठ म्हणून कार्य करणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवाद साधला जाणार असून, सामाजिक व विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या भुमीपूजन समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवर व सर्व मित्रपरिवार यांच्या शुभहस्ते विधी पार पडणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून
श्री. विठ्ठल सदाशिव सायकर,श्री. सचिन गौतम चव्हाण, आखोणी (सरपंच),श्री. हनुमंत सदाशिव सायकर,श्री. तुकाराम नामदेव सायकर,श्री. दादा गोविंद सायकर,श्री. मोहन नारायण सायकर आणि मा. श्रीकांत (भैय्या) सायकर मित्रपरिवारयांनी पुढाकार घेतला आहे.
या शुभप्रसंगी परिसरातील नागरिकांनी व हितचिंतकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9763198864, 9766187062, 7796974767
हा भुमीपूजन समारंभ राशीन व परिसराच्या विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, वृंदावन लॉज & कॉम्पलेक्स तसेच जनसंपर्क कार्यालय भविष्यात सामाजिक व आर्थिक घडामोडींचे केंद्र बनेल, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.






