
महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर आज रविवार दि. 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता वालवड येथे होणार आहे.
विधान परिषद सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे साहेब हे नेहमीच सामाजिक कार्य, लोककल्याण आणि जनसेवेच्या माध्यमातून समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव साजरा न करता समाजोपयोगी उपक्रम राबवावा या उद्देशाने श्री. केतन पांडुळे मित्र परिवार, वालवड यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या घडीला रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, अशा उपक्रमांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया रुग्ण, गरोदर माता तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान हे जीवनदायी ठरते. या शिबिराच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ट्रॅक सूट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे तरुणांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपस्थित राहणार असून, रक्तदान प्रक्रिया पूर्णतः सुरक्षित व शास्त्रोक्त पद्धतीने पार पडणार आहे.
वालवड व परिसरातील नागरिक, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व रक्तदात्यांनी या पवित्र कार्यात सहभागी होऊन मा. ना. प्रा. राम शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधावे, असे आवाहन आयोजक श्री. केतन पांडुळे मित्र परिवार , वालवड यांच्या वतीने करण्यात आले आहे.






