तालुक्यातील घारगाव येथील श्री दत्तकृपा फाऊंडेशन संचलित साईकृपा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मधील डी फार्मसी उन्हाळी परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये उन्हाळी २०२४ परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य अमोल खेडकर यांनी दिली. डी फार्मसी प्रथम वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळ यांच्या अंतर्गत झालेल्या अंतिम परीक्षेमध्ये प्रथम वर्षात प्रथम क्रमांक दीप्ती गावडे , व्दितीय क्रमांक रोहित बलदोटा , तृतीय क्रमांक स्नेहल कांबळे यांनी पटकाविला. तसेच द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक दिशा नरसाळे , द्वितीय क्रमांक अनुक्रमे प्रगती देशमुख व कोमल झगडे , तृतीय क्रमांक दिपाली काळे हिने पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, सचिव सौ. अर्चना दत्तात्रय पानसरे, प्राचार्य डॉ. अमोल खेडकर , विभागप्रमुख विक्रम पानसरे , रजिस्टार श्री. कल्याण शिंदे, कॅम्पस डायरेक्टर श्री. प्रमोद लगड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांची अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






