
आज न्यु गुरुकुल इंग्लिश स्कूल , कर्जत येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रतिमेचे पूजन केले. तसेच योगिता पारखे यांनी राजर्षी शाहु महाराज यांचा जिवन परिचय विद्यार्थ्यांना देऊन ज्ञान वृद्धिंगत केले.
असा हा सुंदर सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. किरणजी नाईक (समन्वयक ) , श्री .शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.






