राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दादा पाटील महाविद्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

Google search engine

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती निमित्त दादा पाटील महाविद्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रा. अनंत सोनवणे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

याप्रसंगी इतिहास विभागाचे प्रा. हरीष भैलुमे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, शाहू महाराजांनी तत्कालीन काळात आपल्या कोल्हापूर संस्थानात अनेक लोकहिताचे निर्णय घेतले व ते प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी करून दाखवले. शाहू महाराज हे अत्यंत राष्ट्रप्रेमी, दानशूर, बुध्दीमान, बलदंड शरीरयष्टी लाभलेले कलाप्रेमी लोकराजा होते. समताधिष्ठित, नितीमान समाज निर्माण करण्याचे त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरक ठरत असल्याची त्यांनी याप्रसंगी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी यांनी मानले.