दादा पाटील महाविद्यालयात ‘सीईटी २०२५’ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Google search engine

 

कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये सीईटी २०२५ मध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला मा. बाळासाहेब साळुंखे, उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, डॉ. संदीप पै, प्रा. राजेश दळवी, प्रा. पवन कडू तसेच कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. राजेंद्रतात्या फाळके होते.

सीईटी २०२५ परीक्षेमध्ये पीसीबी ग्रुपमध्ये अनारसे दीपक नितीन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने ९७.७८ पर्सेंटाइल गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर मोहळकर साक्षी अजिनाथ हिने पीसीएम ग्रुपमध्ये ९६.१४ पर्सेंटाइल गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली. महाविद्यालयातील जवळपास १८ विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त पर्सेंटाइल गुण मिळालेले आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान राजेंद्रतात्या फाळके यांच्या हस्ते महाविद्यालयात करण्यात आला. याप्रसंगी बोलताना राजेंद्रतात्या फाळके म्हणाले की, कर्जतसारख्या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या दादा पाटील महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी सुविधा व मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळेच दादा पाटील महाविद्यालयामध्ये शिकणारा विद्यार्थी नेहमीच गुणवत्तेमध्ये झळकताना दिसतो आहे.

याप्रसंगी ऋतिका रुपनर, दीपक गदादे, नितीन अनारसे, गार्डी सर यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जयदीप खेतमाळीस यांनी तर आभार प्रा. प्रवीण घालमे यांनी मानले.