रूईगव्हान ग्रामपंचायत सरपंच पदी आप्पासाहेब पवार यांची बिनविरोध निवड

Google search engine

 

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रूईगव्हान ग्रामपंचायत सरपंच पदी आज आप्पासाहेब भाऊसाहेब पवार यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत रुईगव्हाण ता. कर्जत जिल्हा अहिल्यानगर याठिकाणी आज 03 मे 2025 रोजी सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली.

या सरपंच निवडीसाठी सभेला अध्यक्ष म्हणून श्री. संतोष मच्छिंद्र तनपुरे , मंडळ अधिकारी वालवड तथा अध्याशी अधिकारी यांनी काम पाहिले .

सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने सरपंच पदी श्री. आप्पासाहेब भाऊसाहेब पवार यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी जालिंदर मूळे उपस्थित होते.

यावेळी बोलताना नवनियुक्त सरपंच अप्पासाहेब भाऊसाहेब पवार म्हणाले , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाचा सर्वसमावेशक विकास करणार आहोत. निवडीबद्दल सरपंच श्री. आप्पासाहेब भाऊसाहेब पवार यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.