वेळेवर नियमित करभाडे भरूनही परत करभाडे भरण्याची ग्रामसेवकाची मागणी , आप्पा नामदेव हगारे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार 

Google search engine

 

चिंचोली रमजान येथील ग्रामसेवक गाडेकर भाऊसाहेब यांनी आप्पा नामदेव हगारे यांनी नियमित वेळेवर गाळ्याचे करभाडे भरून देखील पुन्हा एकदा तुमचे थकलेले करभाडे भरा असे असे सांगितले.

यावेळी बोलताना आप्पा नामदेव हगारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी नियमित गेल्या दोन वर्षाचे भाडे भरले असून एक वर्षाचे भाडे राहिलेले आहे. माझ्याकडे तशा ग्रामपंचायत च्या पावत्या असून देखील ग्रामपंचायत अधिकारी गाडेकर भाऊसाहेब यांनी मी गेली तीन वर्ष भाडे भरले नाही असे सांगितले .परंतु माझ्याकडे फक्त एक वर्षाचे भाडे थकले असून बाकी दोन वर्षाचे भाडे मी नियमित भरले आहे. त्याच्या पावत्या माझ्याकडे आहेत मात्र ग्रामपंचायतकडे फक्त एक वर्षाची नोंद आहे .बाकी नोंद नसून मी तशी लेखी मागितली आहे असून ग्रामपंचायत अधिकारी यांनी लेखी दिली आहे. त्यानुसार मी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे.