माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक पदी बाजीराव अनभुले

Google search engine

 

 

जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या, नुकत्याचं झालेल्या निवडणुकीत ,सर्वसाधारण मतदारसंघातून, श्री गुरुदत्त विद्यालय,घुमरी(ता.कर्जत). या विद्यालयाचे शिक्षक बाजीराव अनभुले हे, स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या नेतृत्वाखाली, ४३०० मते मिळवून विजयी झाले.

नवनिर्वाचित संचालक, बाजीराव अनभुले हे कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या विजयाबद्दल कर्जत तालुक्यासह, जामखेड तालुक्यातील काही मान्यवरांनी ,माध्यमिक शिक्षक सोसायटी शाखा कर्जत, या ठिकाणी येऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षक नेते संजय वराट माजी संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड, प्राचार्य नानासाहेब सुद्रिक, प्राचार्य आप्पासाहेब शिरसाट ,प्राचार्य शंकर खताळ , साधु सरोदे साहेब,

राजेंद्र माने अध्यक्ष- कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघ, वसंत जाधव ,राजू तरटे, शाखाधिकारी एकनाथ कोकाटे, लिपिक संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

मतदारांनी आम्हा सर्व एकवीस संचालकांवर टाकलेला विश्वास व दिलेली संधी, याचे नक्कीचं सोने करून दाखवू, अशी ग्वाही नूतन संचालक बाजीराव अनभुले यांनी दिली.