निंबोडी येथे छावा चित्रपट सर्व ग्रामस्थांना दर्शविण्यात येणार 

Google search engine

 

निंबोडी येथे 30 मार्च रोजी रात्री 07.30 वाजता छावा चित्रपटाचे भव्य दिव्य अशा स्वरूपात मोफत प्रदर्शन हनुमान मंदिर येथे उत्तम मारुती गरड यांचे चिरंजीव अजित ऍग्रो एजन्सी , माहीजळगाव , अरणगाव चे संचालक सुजित उत्तम गरड व श्री.हनुमान दूध संकलन केंद्र , निंबोडीचे संचालक अजित उत्तम गरड यांच्या तर्फे चित्रपटाचे मोफत आयोजित करण्यात आले आहे.

निंबोडी येथील ग्रामस्थांना मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक चित्रपट पाहण्याचा आनंद मिळणार आहे. हा कार्यक्रम गावातील सर्व नागरिक, विशेषतः महिला आणि मुलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असून नव्या पिढीपर्यंत त्यांच्या पराक्रमाची गाथा पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

या अनोख्या चित्रपट सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.