लोकमत भूमिपुत्र पुरस्काराने अँड.योगेश कापरे सन्मानित 

Google search engine

 

लोकमत भूमिपुत्र पुरस्काराने अँड.योगेश कापरे यांना आज सन्मानित करण्यात आले. आज जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड , शिवाजीनगर पुणे येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यास क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.दत्तात्रय भरणे , पंकज देशमुख , पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण , प्रवीण बढेकर , संस्थापक अध्यक्ष , बढेकर ग्रूप , राहुल पंडीत , पार्टनर , पंडित जावेडकर असोसियेट्स हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.लोकमत आणि बाढेकर ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला. लोकमत भूमिपुत्र पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल अँड.योगेश कापरे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तामामा भरणे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार अँड.योगेश कापरे यांना प्राप्त झाला.

हा प्रतिष्ठित “भूमिपुत्र पुरस्कार” लोकमत वृत्तपत्राच्या वतीने मिळालेला हा सन्मान एक मराठी भूमिपुत्र म्हणून अभिमानास्पद क्षण आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

या यशाचा हा सोनेरी टप्पा माझ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि सर्वांच्या विश्वासामुळे शक्य झाला असेही ते यावेळी म्हणाले.