माऊली पेट्रोल पंपाचा ( HP )२६ जानेवारी रोजी शुभारंभ  लवकरच सीएनजी सुविधा उपलब्ध होणार : संचालक अक्षय राऊत 

Google search engine

 

तालुक्यात कर्ज़त येथे प्रथमच अक्षय विठ्ठल राऊत यांचे माऊली पेट्रो स्टेशन सुरू होत आहे. कर्जत, राशीन आणि मिरजगाव शहरातील सर्व कंपनीच्या पेट्रोल पंपापेक्षा २५ ते ५० पैसे कमी दराने पेट्रोल व डिझेल कायमस्वरूपी दराने देणार आहोत अशी माहिती संचालक अक्षय राऊत यांनी दिली.

यावेळी बोलताना अक्षय राऊत म्हणाले, आपल्या पारदर्शी सेवेतून व्यवसायिक व व्यक्तिगत वापरातून ग्राहकांना १ वर्षात लाखो रुपये वाचवता येणार आहेत.

या पेट्रोल स्टेशनवर विविध सुविधा उपलब्ध आहेत. एचपी म्हणजे शुद्ध इंधनाची हमी, एचपी म्हणजे मायलेज, २४ तास सेवा उपलब्ध, फ्री एअर व पाणी सुविधा, नायट्रोजन सुविधा, सर्व डिजिटल पेमेंटची सुविधा, स्वच्छ स्वच्छतागृह, प्रशस्त पार्किंग सुविधा आणि लवकरच सीएनजी सुविधा उपलब्ध होणार आहे. माऊली पेट्रोल स्टेशन, क़र्ज़त- राशिन रोड, कर्ज़त येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला सकाळी ११ वाजता माऊली पेट्रोल स्टेशनचा उद्घाटन समारंभ होणार आहे तरी सर्व तालुक्यातील ग्राहकांनी आवर्जून या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती दर्शवण्याचे आवाहन संचालक अक्षय राऊत यांनी केले आहे.