वायसेवाडी उपसरपंच पदी सौ. छाया नवनाथ भिसे यांची बिनविरोध निवड

Google search engine

 

ग्रामपंचायत वायसेवाडी उपसरपंच पदी आज सौ. छाया नवनाथ भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सभेला सौ. मृणाली मल्हारी सुळ, माजी उपसरपंच सौ. मनीषा दत्तात्रय पवळ,श्री. महादेव अंकुश कायगुडे, श्री. अशोक काशिनाथ पवळ, श्री. भीमा पारोजी हिरणवाळे आदी उपस्थित होत्या.

निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच श्री मनेश पोपट हिरनवाळे यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी श्री.शुभम घोडके उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ. छाया नवनाथ भिसे म्हणल्या , येणाऱ्या काळात गावाचा सर्वसमावेशक विकास करणार असून सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने मूलभूत गरजा व इतर सर्व सुविधा आदी बाबींवर काम करणार आहे.

निवडीबद्दल सौ. छाया नवनाथ भिसे यांचे सरपंच वायसेवाडी व समस्त ग्रामस्थ , वायसेवाडी यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.