शिक्षणशास्त्र महाविद्यालय घारगाव येथील छात्र अध्यापक यांचे शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये घवघवीत यश

Google search engine

 

 

श्री दत्तकृपा शिक्षण व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालय, घारगाव येथील विद्यार्थिनी अवघडे वैशाली राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) व विघे रुचिका या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण केली. या विद्यार्थी शिक्षकांना संस्थेच्या सचिव सौ.अर्चनाताई पानसरे, प्राचार्य डॉ.गोंटे मच्छिंद्र, प्राध्यापिका शिंदे मॅडम, पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .

या यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात शिक्षक वृंद यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक खेंडके सर शेलार,कोळेकर सर,शिंदे सर,आहेर सर,भोईटे मॅडम,थिटे मॅडम,लोकरे मॅडम उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.गोंटे एम.आर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या यशामुळे महाविद्यालयाचे नाव अधिक उज्जवल होईल, अशी आशा व्यक्त केली. तसेच, शिक्षण क्षेत्रातील उत्तम उदाहरण म्हणून त्यांचा आदर्श इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही ते म्हणाले.

दत्तकृपा शैक्षणिक संकुल च्या सचिव सौ .अर्चनाताई पानसरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, भविष्यातही अधिक विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी महाविद्यालयाने योग्य मार्गदर्शन व पाठबळ देत राहील, असे आश्वासन दिले.

सत्कार समारंभात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शिक्षण क्षेत्रात आणखी मोठे यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.