
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित उत्तर विभागीय कार्यालय, अहिल्यानगर येथे विभागीय गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील विद्यार्थिनी साक्षी रूपचंद माने (१२ विज्ञान) प्रथम क्रमांक, कु. वैष्णवी अनिल मसाल (११ वी कला) द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक व सांस्कृतिक विभागाच्या वतीने अभिनंदन केले आहे.
या यशस्वी विद्यार्थिनींना प्रा. मीना खेतमाळीस, प्रा. संगीता भोसले यांनी मार्गदर्शन केले.






