
आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांची भांबोरा ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी भेट घेतली.यावेळी ग्रामपंचायत भांबोरा अंतर्गत विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या बैठकीसाठी २५ मिनिटे वेळ दिला. यावेळी बैठकीसाठी ओमप्रकाश गोसावीजी , उपाध्यक्ष , गावचे सरपंच सचिन जगताप, उपसरपंच दीपक लोंढे , माजी सरपंच अमोल लोंढे , मा.उपसरपंच विकास रंधवे , ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विकास कामाबाबत सढळ हाताने मदत करण्याची भूमिका घेतली .यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सर्वांनी आभार मानले.यावेळी सर्व पदाधिकार्यांनी अजित दादा पवार यांचे उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.







