
माजी मंत्री भूमिपुत्र प्रा. आ.राम शिंदे साहेब हे विकासाचे जनक असून भोसे व परिसरातील गावांतून मोठे लीड देणार असल्याचा निर्धार गणेश खराडे यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, माजी मंत्री प्रा . राम शिंदे यांच्या रूपाने मतदार संघात कोट्यवधींचा निधी आणून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.
यावेळी बोलताना ते म्हणाले , महायुती सरकारने माझी लाडकी बहिण योजना आणली. भोसेच्या विकास कामासाठी आमदार प्रा.रामजी शिंदे साहेब व पै.प्रवीण दादा घुले पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन मोठी विकासकामे दिली.
‘शाश्वत विकास’ काय असतो हे शिंदे साहेबांनी आपल्या ‘मंत्रिपदाच्या’कार्यकाळात दाखवून दिले. जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी शिवारांना ‘जलसमृद्ध’ केले,शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या,जलयुक्तची दखल केवळ राज्य नाही तर केंद्र पातळीवर घेतली गेली.याचा आम्हाला अभिमान आहे.जलयुक्त शिवार योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा कर्जत जामखेड व राज्यालाही झाला व होत आहे.
रस्ते क्राँकिटीकरन , चखालेवाडी बंधारा, डांबरीकरण,जलयुक्त शिवार,सभा मंडप, विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडप , राम मंदिर सभा मंडप, अंतर्गत रस्ते , घरकुल, जलसंधारण यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला व इतरही कामे मंजुर होऊन सुरु झाले आहेत. आपल्या गावाच्या विकासाला कायम साहेबांनी व प्रवीणदादांनी प्राधान्याने दिले आहेत. यापुढेही राहिलेले कामे होण्यासाठी भरीव निधी आ . प्रा.रामजी शिंदेसाहेब देणार आहेत. आपण येणाऱ्या निवडणुकीत गाव विकासासाठी साथ देण्यासाठी श्री. राम शंकर शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
आ.प्रा.राम शिंदे साहेबांना भरघोस मतदान देवून त्यांचे हात बळकट करणार आहोत अशी खात्री त्यांनी दिली.






