
आमदार रोहित पवार यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता व इथला मतदारराजा उभा असल्याने दादांचा विजय निश्चित असल्याची खात्री युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष लखन टकले यांनी दिली .
कर्जत तालुक्यातील नेतेमंडळी एका बाजूला गेले तरी सर्वसामान्य जनता आमदार रोहित दादा पवार यांच्यामागे खंबीर पणे पाठीशी आहे.
तालुक्यातील नेतेमंडळी सर्व एका बाजूला गेलेले आहेत , गेल्या पंधरा वर्षात हे नेते मंडळींना मीच आमदार होईल असे वाटत होते. म्हणून सर्वजण एकत्र उभा राहिले पण यांना एकालाही यश आलं नाही ज्यावेळेस देशमुख यांना आमदार करण्याची गरज होती त्यावेळेस या सर्वांनी कुरगुडेच राजकारण करून देशमुख यांनाही पाडले आणि स्वतःही पडले आणि त्यानंतर कायमस्वरूपी एकमेकांच्या कुरघोड्या करण्यातच यांचं राजकारण चालला आहे येथील जनता सर्व यांच्या कुरघोड्याचे राजकारणाला वैतागले असून आता खरी ताकद दाखवण्याची वेळ जनतेने दाखवली आहे त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता व इथला मतदार उभा असल्याने दादांचा विजय निश्चित आहे हे सर्व नेते मंडळी कायमस्वरूपी कुरघोडी राजकारण करत आलेले आहेत यांना दुसरा मोठा झालेला किंवा नवीन चेहरा पुढे आलेला सहन होत नाही. कारण यांना विचारणारे कार्यकर्ते पाहिजेत . नेता तयार होऊ द्यायचा नाही ही इथली भूमिका कायमस्वरूपी इथल्या सर्व नेते मंडळींनी घेतल्यामुळे जनता वैतागली आहे.
आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात मतदारसंघात शास्वत विकास करत रस्ते, पाणी, सिंचन, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण, एसआरपीएफ सेंटर, शासकीय इमारती,अध्यात्मिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले. याच कामाच्या बळावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि हीच विकामकामे आमदार रोहित पवार यांना विजयाचा गुलाल लावणार अशी जोरदार चर्चा सध्या गावोगावी, वाडी वस्त्यावर सगळीकडे ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.आमदार रोहित पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून त्यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी तळमळ पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत.
पुढे ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात प्रत्येक घटकांसाठी काम केले असून युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांसाठी केलेले काम खूप प्रशंसनीय असून त्या कामाची पोचपावती म्हणून कर्जत- जामखेड मतदारसंघातील मतदार आ.रोहितदादांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून देणारच आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात कोणतीही शंका नाही.
आ.रोहीत दादा पवार हे दूरदृष्टी असणार नेतृत्व व कर्जत जामखेड मतदारसंघाचा विकास करणारे नेतृत्व असून व्हिजन असणारे हे तरुण नेतृत्व आहे उद्याचे भविष्य आमदार रोहित पवार यांच्या मुळे तरुणांचे भविष्य उज्वल होणार आहे .
आ. रोहितदादा पवार यांचे नेतृत्व हे महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीने उभरते नेतृत्व असून त्यांचे कार्य हे युवकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. २०१९ मध्ये ४३ हजार मतांनी निवडून आल्यानंतर आ .रोहित दादांचे फक्त निवडणुकी अगोदर दोन महिने काम होते तरी लोकांनी एवढा विश्वास दाखवला. त्यानंतर त्यांनी पाच वर्षात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या जोरावर त्याच कामाच्या रूपाने आ.रोहित दादा प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले व प्रत्येकाचा हृदयामध्ये स्थान निर्माण केले म्हणून दिलसे दादा फिरसे दादा असे म्हणत त्यांनी आ.रोहीत दादा यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
कर्जत- जामखेडमधील सर्व युवा वर्ग रोहितदादांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. कारण स्वातंत्र्यानंतर जवळजवळ ७२ वर्षांनी मतदारसंघातील सर्व घटकांच्या अडी अडचणीची जाण असणारे नेतृत्व प्रथमच कर्जत जामखेड मतदारसंघास लाभले असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष लखन टकले यांनी म्हटले आहे.
आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात मतदारसंघात रस्ते, पाणी, सिंचन, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण, एसआरपीएफ सेंटर, शासकीय इमारती, अध्यात्मिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले. याच कामाच्या बळावर ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि हीच विकामकामे आमदार रोहित पवार यांना विजयाचा गुलाल लावणार अशी जोरदार चर्चा सध्या गावोगावी, वाडी वस्त्यावर सगळीकडे ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.आमदार रोहित पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून त्यांची सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असणारी तळमळ पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत.
पुढे ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात प्रत्येक घटकांसाठी काम केले असून युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्धांसाठी केलेले काम खूप प्रशंसनीय असून त्या कामाची पोचपावती म्हणून कर्जत- जामखेड मतदारसंघातील मतदार आ.रोहितदादांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून देणारच आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात कोणतीही शंका नाही. आमचा कर्जत – जामखेड मतदारसंघातील सर्व युवावर्ग दादांच्या अंगी असणाऱ्या नेतृत्वगुणांमुळे व पवार साहेबांसारखीच झपाटल्यासारखे न काम करण्याची क्षमता अंगी असल्यामुळे रोहितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहू न इच्छितो. येणारे सरकार हे निश्चितच महाविकास आघाडीचे असणार आहे व त्यामध्ये दादांना दादांना मंत्री पद मिळणार असणार आहे याची मतदारसंघातील सर्वांना खात्री आहे आणि त्यामुळे मतदारसंघाचा जो विकास होणार आहे त्याचा झपाटा खुप हा खूप मोठा असणार असून आपल्या विचारांचे सरकार नसताना दादांनी मागील अडीच वर्षात मतदारसंघात जी काही कामे केली आहेत ती विरोधकांना सरकार असतानाही दूरदृष्टी नसल्याने करता आली नाहीत.
आ.रोहीत दादांनी कर्जत जामखेड हा भाग भौगलिकदृष्ट्या कमी पावसाचा भाग असल्यामुळे त्यातच हा ग्रामीण मतदार संघ असल्याने येथील अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असल्याने त्यासाठी जलसंधारण साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणून विविध प्रकारचे बंधारे बांधलेच शिवाय या जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती , गेट बसवणे, गाळ काढणे , ओढ्यांचे खोलीकरण , या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण्याचा आणि ते जमिनीत जिरवण्याचा प्रयत्न केला.
अवर्षणग्रस्त भाग असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ पाणीदार करण्याचा आ.रोहीत दादा यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.यासाठी त्यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि सीएसआरच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी भरीव निधी आणला.
विरोधकांनी मतदारसंघात कामे आणण्याऐवजी दादांनी आणलेली बहुतांश कामे अडवण्यात आणि मतदारसंघाचा विकास अडवण्यातच आपली सर्व शक्ती खर्च घातली. हे सर्व मतदार जाणून आहेत आणि त्याचा रोष ते मतदानातून व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
मतदारसंघातील विकासासाठी दादांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही हे सर्व मतदार राजा जाणून असून आम्ही कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्व शेतकरी, युवक,विद्यार्थी, महिला, वृद्ध सर्व घटकांनी येणाऱ्या २० नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीत दादांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निश्चय केला असल्याचे लखन टकले यांनी म्हटले आहे.






