आ.राम शिंदे साहेब विक्रमी मतांनी विजयी होतील : आनंद कवडे , अध्यात्मिक आघाडी तालुका उपाध्यक्ष

0
181
Google search engine

 

कर्जत जामखेड मतदार संघाची विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यावर आली असून भूमिपुत्र राम शिंदे साहेब यांनी सर्वच बाजुने आघाडी घेतल्याने विरोधकांचे धाबे दणाणले असून आजच आ. प्रा.राम शिंदे साहेब यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया आनंद कवडे , अध्यात्मिक आघाडी तालुका उपाध्यक्ष यांनी दिली .

आ . प्रा.राम शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांना प्राधान्याने कुकडी आवर्तन दिल्याने आज तालुका बागायती म्हणून ओळखू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरातील व्यक्ती अर्थात प्रा .राम शिंदे साहेब यांच्या मागे राहून त्यांनी मतदान करून साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

धनदांडग्या असणाऱ्या प्रस्थापित अशा बलाढ्य शक्ती विरोधात निवडणूक लढवण्यासाठी आ.राम शिंदे साहेब सज्ज झाले आहेत.आ. प्रा.राम शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. सालगड्याचा मुलगा ते आमदार मंत्री असा त्यांचा प्रवास आहे .गोरगरिबांचा नेता अशी त्याची ओळख असल्यामुळे त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला असून होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा सामना रोहित पवार या धनदांडग्या प्रस्थापित शक्ती विरोधात आहे .रोहित पवारांच्या बलाढ्य शक्तीपुढे लढण्यासाठी मतदार संघात कार्यकर्ते एकवटले असून मतदार राजाने आ .राम शिंदे साहेब यांना साथ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

आ.राम शिंदे साहेब यांच्या वडिलांनी कित्येक वर्ष साल घातली त्यांचा गरिबीची जान आहे. गरिबी काय असते भोगली अनुभवली लोकांच्या हाल अपेष्टा काय असतात त्या अनुभवल्यात गोरगरिबांच्या सामान्य शेतकरी वर्गातील , सामान्य कुटूंबातील असामान्य नेतृत्व कसे निर्माण होते याचं आदर्श उदाहरण म्हणजे प्रा.राम शिंदे सर . समाजाला जर योग्य दिशा दयायची असेल तर प्रत्येक गावात शेतकरी वर्ग, गोरगरीब, बहुजन, कष्टकरी निराधार महिला वर्ग, युवक वर्गाचे व्यवस्थित संघटन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या सर्व वर्गामधून नेतृत्व निर्माण करण्याचे काम प्रा.आ.राम शिंदे साहेबांच्या रुपाने घडत आहे. या संदर्भात राम शिंदे साहेब नेहमीच सांगतात राजकारणात तरुण वर्ग आल्याशिवाय राजकारणाची दिशा बदलणार नाही माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील अनेक युवकांना राजकीय क्षेत्रातील आवड निर्माण करुन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांची जोड कशा पद्धतीने असते.याबद्दल इतर नेत्यांपेक्षा त्यांची भूमिका सतत मी अनुभवत असतो त्यावर अनेक नेते मंडळींनी चिंतन करायला हवे.