
दादा पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहरातील एस. टी. स्थानक परिसरात नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. स्वयंसेवकाच्या अंगी स्वयंशिस्त लागावी त्याचबरोबर महात्मा गांधींनी सांगितलेले स्वच्छतेचे महत्त्व समजावे शिवाय कर्जत शहरातील परिसर स्वच्छ असावा या उद्देशाने या स्वच्छता उपक्रमाचे आयोजन एन.एस.एस. विभागामार्फत करण्यात आले होते.
या उपक्रमामध्ये दादा पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एन.एस.एस. विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. वाल्मीक कापसे, प्रा. बलभीम महानगर, डॉ. कैलास रोडगे यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले






