२०२४ विधानसभेला आ.रोहित दादा पवार फिक्स आमदार गावभेटीच्या नेत्यांवर साधला राष्ट्रवादी चे कर्जत तालुका कार्याध्यक्ष किशोर अडसूळ यांनी साधला निशाणा 

Google search engine

 

गेल्या काही दिवसांपासून कुळधरण व तालुक्यातील गटांतील गावांमध्ये काही पक्षातील व्यक्तींकडून गाव भेट दौरा चालू केलेला आहे . या गाव भेट दौऱ्यावर राष्ट्रवादीचे कर्जत तालुका कार्याध्यक्ष किशोर अडसूळ यांनी चांगलेच शरसंधान साधले आहे.

यावेळी ते बोलताना म्हणाले , या गावभेट दौऱ्यामध्ये फक्त माननीय कार्यसम्राट आ. रोहित दादा पवार यांच्या विरोधात काहीतरी बोलण्याचा केविलवाना प्रयत्न केला जात आहे आणि सर्वसामान्य जनतेला त्यांनी केलेल्या विकास कामांबद्दल चुकीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.

परंतू गाव भेट दौऱ्यातील पुढाऱ्यांना विचारायचे आहे की आमदार रोहित दादा पवार हे २०१९ मध्ये कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार झालेले आहेत. त्यांच्या अगोदर पासून तुम्ही कर्जत तालुक्याच्या राजकारणावरती वर्चस्व करत आहात त्यावेळेस तुमच्याकडे विविध प्रकारची पदे होती, तुमच्याकडे विविध कामांसाठी सर्वसामान्य जनता येत होती त्यावेळेस तुम्ही सर्वसामान्य जनतेची कोणत्या प्रकारची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आरोग्य , शैक्षणिक, धार्मिक कौटुंबिक, रोजगार,युवकांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न,जेष्ठांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, कोरोना काळामध्ये कर्जत जामखेड ला वाचवण्यासाठी कोणती ठोस भुमिका घेतली होती . शाळेतील विद्यार्थी , मुलींचे कोणते प्रश्न सोडवले का, त्यांना बस, त्यांच्या सुरक्षतेसाठी काय उपाययोजना केल्या आहेत का ? कर्जत पर्यटन व्हावे यासाठी पाठपुरावा केला आहे का ? अध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोणती भरीव कामगिरी केली आहे का ? आता आपण सर्व जण एकत्र फिरत आहात ज्यावेळी सर्वसामान्य जनतेला पाण्याची नितांत गरज होती त्यावेळी का तुम्ही कोनीच एकत्र आला नाहीत किंवा का स्वखर्चातून एखादा पाण्याचा टँकर चालु करण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही आता पर्यंत अशा कोणत्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे का आणि आता माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून असे कोणतेच क्षेत्र शिल्लक नाही की त्या क्षेत्रामध्ये रोहित दादा यांचे कार्य नाही आणि मग हे सर्व करत असताना सर्वसामान्य जनतेचे आणि आमदारांचे जे कौटुंबिक संबंध तयार झाले हे पाहून जर ठराविक लोकांच्या पोटामध्ये गोळा येत असेल तर ही जनता एवढी सुद्धा दूध खुळी नाही.रोहित दादा पवार यांची कार्यपद्धती काय आहे याचा संपूर्ण कर्जत जामखेड मतदार संघाला अभ्यास झालेला आहे, अनुभव आलेला आहे त्यामुळे कोणी कितीही वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला किंवा जनतेला वेगळ्या पद्धतीने भुलथापा देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही जनता माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या पाठीशी येणाऱ्या काळात ठामपणे आणि भक्कमपणे आणि खंबीरपणे उभा राहणार म्हणजे राहणारच.

येथून मागे जनतेला कोणीच वाली नव्हता त्यावेळेस तुम्ही सर्वांनी जनतेला कोणत्या प्रकारची मदत केली . सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही काय केले, कोणत्या गोरगरीब कुटुंबाला तुम्ही मदत केली,कोणत्या युवकांच्या हाताला तुम्ही रोजगार मिळवून दिला,कोणाचे तुम्ही शैक्षणिक कल्याण केले,कोणाच्या सुखदुःखामध्ये तुम्ही धावून आले, कधी कोणाला तुम्ही दुःखामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, कधी तुम्ही साधा हॉस्पिटलचे बिल कमी करण्यासाठी तरी फोन केला का,एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घ्या त्यांना पाहिजे ती मदत करा असा कधी आपण प्रयत्न केला का.मग जो व्यक्ती आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, अडीअडचणीमध्ये काळामध्ये आमच्यासाठी आमच्या पाठीशी विठ्ठल बनून उभा राहतो त्या व्यक्तीच्या विरोधात आपण कितीही षडयंत्र करण्याचा किंवा कितीही खोटी बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा त्याचा किंचित सुद्धा परिणाम कर्जत जामखेड मतदार संघातील जनतेवरती होणार नाही त्यामुळे आमचे फिक्स आणि फिक्स आमदार हे फक्त रोहित दादा पवारच .

आदरणीय रोहित दादा पवार आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. तुमच्यासारखं नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व सर्वगुणसंपन्न नेतृत्व आम्हाला कर्जत जामखेड मतदार संघाला मिळालं याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया कर्जत तालुका कार्याध्यक्ष त्यांनी यावेळी दिली .