अरिहंत कृपा फाउंडेशन, मुंबई  यांचा मदतीचा हात

Google search engine

अनाथ आश्रम प्रणेता परमपूज्य गणीवर्य जिनरत्न विजयजी महाराज साहेब प्रेरीत , जिनभक्ती मानव सेवा बाल आश्रम ,कात्रज , पुणे येथील अनाथ ,निराधार ,गरजवंत मुलांची वार्षिक शैक्षणिक फी दिली तसेच शालेय गणवेश यांची भेट श्री.जुलेश भाई शहा यांच्या वतीने देण्यात आली.

अनाथ निराधार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत त्यांचे आयुष्य सुखकर समृद्धीपूर्ण व्हावे या उद्देशाने श्री.जुलेश भाई शहा हे अरिहंत कृपा फाउंडेशन, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून नेहमी मदतीचा हात देत असतात.या बाल आश्रमासाठी परमपूज्य गनिवर्य जिनरत्न विजयजी महाराज साहेब यांचे मार्गदर्शन तसेच आशीर्वाद लाभतात.संस्थेतील विद्यार्थ्यांना मदत केल्या बद्दल आश्रमाचे संचालक श्री.शरदचंद्र आढाव यांनी आभार व्यक्त केली