ग्रामपंचायत सदस्य सुधीर बचाटे  यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा 

Google search engine

 

 

तालुक्यातील मांदळीचे ग्रामपंचायत सदस्य सुधीर बचाटे त्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार निलेश लंके व आ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना फळ रोपांचे वाटप व खाऊ वाटप केले .

दरम्यान मांदळी येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केशर आंबा रोपांचे वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.

तसेच अंगणवाडी येथे लहान बालगोपाळांना खाऊ वाटप करुन उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत अवाढवी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी समाजाला एक वेगळाच संदेश दिला आहे.

यावेळी सरपंच भगवान गांगर्डे, मा. सरपंच हौसराव गांगर्डे, मा.सरपंच बलराम बचाटे , मा. सरपंच मोहन गारूडकर, तंटा मुक्त अध्यक्ष निवृत्ती गांगर्डे, ट्रस्ट सचिव बंडु गांगर्डे, ग्रा. प.सदस्य किरण गारुडकर, वाळके साहेब, लालासाहेब गांगर्डे, गौतम बचाटे, अंबादास बचाटे, बबन गांगर्डे, म्हसू बचाटे, शालेय समिती अध्यक्ष श्रीराम गांगर्डे, ठेकेदार स्वप्नील शहाणे, रामदास गांगर्डे, नारायण भुजबळ, शिवाजी पाटील, धनु भुजबळ, संदीप गांगर्डे पप्पू बचाटे, अक्षय बचाटे ग्रा. पं. कर्मचारी संजय क्षिरसागर व नितीन सोनवणे व शिक्षक सटाले सर, थोरात सर , टेकाळे सर उपस्थित होते