मिरजगाव येथील नूतन विद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे व्याख्यान संपन्न; माजी विद्यार्थी रविंद्र शिंदे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Google search engine

येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मिरजगाव येथे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्यानासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. रविंद्र शिंदे साहेब (मांदळी) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन कसे करावे, वेळेचे व्यवस्थापन, जीवनातील मूल्यांचे महत्त्व आणि स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती दिली.

तसेच आपल्या जडणघडणीमध्ये नूतन विद्यालयाचे आणि आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांचे योगदान किती मोलाचे आहे, याबाबत भावनिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले. त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नवी दिशा मिळाली.

या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. खेडकर सर, पर्यवेक्षक श्री. ननवरे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. शिंदे सर, श्री. गोरे सर आणि विद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अनारसे राम सर यांनी केले.