
साईकृपा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, घारगाव येथील डॉ. अंकिता विक्रम पानसरे ( गिरमकर ) यांना राजस्थान येथील नामांकित सनराईज विश्वविद्यालयाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल श्री.दत्तकृपा शैक्षणिक संकुलात सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
डॉ. अंकिता विक्रम पानसरे(गिरमकर) यांनी “Experimental Investigation on Development and Characterization of Multi Particulate System for Anti Depression Drug” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला असून, विद्यापीठाने त्यांच्या उत्कृष्ट आणि समाजाभिमुख संशोधनाबद्दल विशेष गौरव केला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल घारगाव संकुलातील मुख्य कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात श्री.दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव सौ. अर्चनाताई पानसरे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना सौ. अर्चनाताई पानसरे यांनी डॉ. अंकिता विक्रम पानसरे (गिरमकर) यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ही केवळ वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण संकुलासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात त्यांच्या संशोधनातून संस्थेचे नाव आणखी उंचावेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






