कर्जत येथे गीता ज्वेलर्स तर्फे दीपावली व लग्नसराई महोत्सवानिमित्त भव्य लकी ड्रॉ सोडत उद्या 

Google search engine

 

कर्जत येथील प्रतिष्ठित ‘गीता ज्वेलर्स’ तर्फे दीपावली व लग्नसराई महोत्सवानिमित्त ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ सोडतचे आयोजन उद्या करण्यात आले आहे. ग्राहकांच्या विश्वासाला व सहकार्याला सलाम करत प्रोत्साहन व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत असून या लकी ड्रॉमध्ये आकर्षक व मोलाची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

ही लकी ड्रॉ सोडत उद्या गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बाजारतळ येथे असलेल्या गीता ज्वेलर्सच्या मुख्य शाखेत होत आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले असून सोडतचे थेट प्रक्षेपण इंस्टाग्राम लाईव्ह वरून देखील करण्यात येणार आहे, त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या ग्राहकांनाही हा सोहळा पाहता येणार आहे.या भव्य लकी ड्रॉमध्ये विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची सांगड घालण्यात आली आहे.

प्रथम बक्षीस — स्कूटी

द्वितीय बक्षीस — इलेक्ट्रिक स्कूटी

तृतीय बक्षीस — वॉशिंग मशीन

चतुर्थ बक्षीस — आटा चिक्की

पाचवे बक्षीस — सायकल

कर्जत व परिसरातील नागरिकांनी गीता ज्वेलर्सवर दाखवलेला विश्वास आणि प्रेम लक्षात घेऊन हा उपक्रम पारदर्शकपणे राबवला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. ग्राहकांचा आनंद आणि समाधान हेच आमचे ब्रीद असल्याचे प्रो. प्रा. अतुल भालचंद्र कुलथे व हरिओम अतुल कुलथे यांनी नमूद केले.

ग्राहकांसाठी सोयीस्कर सेवा, दर्जेदार दागिने, वाजवी दर आणि विश्वासार्ह व्यवहारामुळे गीता ज्वेलर्सने अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या लकी ड्रॉ उपक्रमामुळे ग्राहक आणि संस्थेतील विश्वासाचे नाते अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कार्यक्रमासाठी सर्व ग्राहक व हितचिंतकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थान: गीता ज्वेलर्स, बाजारतळ, कर्जत, जि. अहिल्यानगर

संपर्क: ९६८५९४९४९४ / ९७३०५१५१११

इंस्टाग्राम लाईव्ह आयडी: geeta_jewellers_