
वालवड (ता. कर्जत) येथे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पै. तानाजी (भाऊ) जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमांनी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक ऐक्य, महिला सबलीकरण व तरुणांना प्रेरणा देणारी ही बहुरंगी कार्यक्रममालिका ग्रामस्थांच्या मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली.
महिला सक्षमीकरणासाठी ‘होम मिनिस्टर’चा अनोखा उपक्रम
सोहळ्याच्या प्रमुख आकर्षणांपैकी होम मिनिस्टर खेळाचा विशेष कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील माता-भगिनींनी उत्साहात सहभाग नोंदवला. सिनेअभिनेता क्रांती नाना मळेगावकर , सह्याद्री मळेगावकर यांच्या खुमासदार सूत्रसंचालन व विनोदी शैलीने कार्यक्रमाला रंगत आणली आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
या उपक्रमाचे आयोजन पुणेरी उद्योग समूहाचे अध्यक्ष शैलेश जालिंदर शिंदे, बालगायिका व टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर आणि वीर बहिर्जी नाईक बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या सचिव सौ. श्रद्धा शैलेश शिंदे यांनी केले.
तरुणांना ‘स्वावलंबनाचा मंत्र’
अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलताना विशिष्ट पाहुण्यांनी तरुणांसमोर रोजगार निर्मितीच्या दिशा दाखवणारा प्रेरणादायी संदेश दिला.
“शेतकरी पुत्रांनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी व्यवसायात उतरून स्वतःचे करिअर घडवावे,” असा सल्ला देत तरुणांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रात संधी साधण्याचे आवाहन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याला बहार
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी टायगर ग्रुपचे पुणे जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पै. तानाजी भाऊ जाधव उपस्थित होते.
त्यांच्यासोबत कर्जत नगरपरिषद अध्यक्षा सौ. रोहीणीताई घुले, जिल्हा परिषद सदस्या सौ. मोहिणीताई घुले, उपसरपंच सुपे विनोद मोटे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सुनील पांडुळे, युवा उद्योजक शुभम शेठ कुलथे, माजी सरपंच विनोद राऊत, सामाजिक कार्यकर्ते संतोष मांडगे, राहुल अवचर, उपसरपंच सचिन पाटोळे, सदस्य चंद्रकांत पांडुळे, पोलीस पाटील महिंद्र कर्पे, वनरक्षक संजय राऊत, माजी सभापती पै. बापू शेळके, सरपंच पै. विजय पोटरे, पै. मनोज थोरात, पै. अवधूत राजे भोसले, सागर देमुंडे, साहिल काझी, किशोर सांगळे व इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
प्रास्ताविक, सूत्रसंचलन आणि संपूर्ण कार्यक्रम सुसंगतपणे पार पाडण्याची जबाबदारी प्रा. कांतीलाल ढवळे यांनी पार पाडली. बक्षीस वितरणानंतर आयोजक शैलेश शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
वालवडमध्ये पार पडलेला हा अभिष्टचिंतन सोहळा सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचा संगम ठरला असून ग्रामस्थांच्या मनात आनंदाचा ठसा उमटवून गेला.







