मा.पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त  वालवड येथे महिला भगिनींसाठी ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची मेजवानी; होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी बक्षिसांचा वर्षाव

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील वालवड गावात महिला–भगिनींसाठी उत्साहवर्धक आणि मनोरंजनात्मक असा “न्यू होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मा. पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाची गावात मोठी चर्चा असून महिलांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.

कार्यक्रम दिनांक: सोमवार, दि. 08 डिसेंबर 2025

वेळ: सायं. 4.00 वाजता

स्थळ: जिल्हा परिषद शाळा शेजारी, वालवड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर

महिलांसाठी खास बक्षिसांचा महापूर

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक बक्षिसांनी सजलेली अनोखी योजना. उपस्थित सर्व माता-भगिनींसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून, भाग्यवान विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.

प्रमुख बक्षिसे:

प्रथम बक्षीस — LED टीव्ही, द्वितीय बक्षीस — कुलर

तृतीय बक्षीस — गॅस शेगडी, चतुर्थ बक्षीस — मिक्सर

पाचवे बक्षीस — कुलर सेट,सहावे बक्षीस — इस्त्री

याशिवाय, लकी ड्रॉमधून इलेक्ट्रिक स्कूटर आणि भव्य पैठणी देण्यात येणार आहे.

तसेच, प्रमुख 6 बक्षिसे जिंकल्यानंतरही भाग्यवान माता-भगिनींना 21 पैठणींचे विशेष बक्षीस देण्यात येईल.

सहभागी सर्व महिलांना कार्यक्रमाच्या स्मरणार्थ आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील.

*कार्यक्रमाचे आयोजक*

सौ. श्रद्धा शैलेश शिंदे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, गावातील महिलांसाठी हा एक मनोरंजक, आनंददायक आणि प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.

मार्गदर्शन व सहकार्य मा. श्री. शैलेश जालिंदर शिंदे यांचे आहे.

*महत्वाची सूचना*

कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांसाठी लकी ड्रॉ कूपने कार्यक्रमस्थळीच भरून घेतली जाणार आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क

९८५००९४९९२

७७४४९४१२०४

९९२२९३४७६९

९६०७३८३४४१

वालवड गावात सोमवारच्या या उपक्रमाने महिलांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मनोरंजन, आनंद, भेटवस्तू आणि उत्साह या सर्वांचा मेळ असलेल्या या कार्यक्रमासाठी गावातील तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.