
मिरजगाव गणातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. या गणात गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक, निष्ठावंत आणि लोकाभिमुख कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा, अशी मागणी गणातील सर्वच कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य मतदार करत आहेत.
तिखी गावचे माजी सरपंच किशोर( केशव) अडसूळ हे या गणातील एक ओळखले जाणारे लोकनेते असून, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक तसेच पर्यावरण विषयक कार्यांत आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे. वृक्ष लागवड असो, मंदिर विकास असो वा गावातील शाळांतील सुविधा सुधारण्याचे काम — अडसूळ यांनी नेहमी पुढाकार घेऊन काम केले आहे.
गणातील नागरिकांचे म्हणणे आहे की, किशोर (केशव) अडसूळ हे कोणत्याही राजकीय स्वार्थापलीकडे जाऊन लोकांमध्ये कार्यरत राहिले आहेत. अडीअडचणीच्या काळात, आजारपणात, शासकीय कामांसाठी दारोदारी फिरावे लागले, तरी ते नेहमी जनतेच्या मदतीला धावून गेले. अनेक गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या वैद्यकीय अडचणींमध्ये त्यांनी मदतीचा हात दिला असून, अनेकांचे काम त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण केले आहे.
परंतु, अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना ऐन वेळी बाजूला ठेवून दुसऱ्यांनाच तिकीट दिले जाते, यामुळे जनतेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “निष्ठावंत राहून काय फायदा?” असा प्रश्न अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात उमटू लागला आहे.
गणातील सर्वसामान्य मतदार , ग्रामस्थांचा ठाम विश्वास आहे की, किशोर (केशव)अडसूळ यांना मिरजगाव गणातून संधी मिळाल्यास, ते जनतेच्या विश्वासाला उतरतील आणि गणातील विकासासाठी आपली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता सिद्ध करतील.
गणातील सर्वच कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि सर्वसामान्य मतदारांनी एकमुखाने मागणी केली आहे की, आगामी निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्ते किशोर ( केशव)अडसूळ यांना तिकीट देऊन आ .रोहित दादा पवार यांनी त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात यावा. यामुळे केवळ जनतेचा विश्वास टिकून राहणार नाही, तर खऱ्या अर्थाने निष्ठा आणि प्रामाणिकतेला प्राधान्य देणारा आदर्श देखील निर्माण होईल.
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी अशी भूमिका स्पष्ट केली होती त्यानुसार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी सर्वसामान्य मतदार यांनी केली आहे.






