टाकळी खंडेश्वरी गणातून अजित चंद्रकांत लाळगे प्रबळ दावेदार ,  २० वर्षांच्या निष्ठावान कार्याचा विकासात्मक ठसा

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी गणातून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान आणि कार्य करणारे कार्यकर्ते अजित चंद्रकांत लाळगे यांनी सुनील काका यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारीची प्रबळ इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या दोन दशकांपासून भाजपसोबत एकनिष्ठ राहून काम करत असलेले लाळगे हे कार्यकर्त्यांमध्ये एक आदर्श आणि जनतेत लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखले जातात.

अजित लाळगे यांनी आपल्या कार्यकाळात पक्षनिष्ठा जपत समाजहिताच्या आणि विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. विशेष म्हणजे, माजी मंत्री राम शिंदे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी वेळोवेळी स्वतःच्या पदरमोडीने प्रचार व जनजागृतीची अनेक कामे केली आहेत. पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक कार्यातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अजित लाळगे यांचा गणातील जनसंपर्क अत्यंत मजबूत असून त्यांचा लोकांशी थेट संवाद आणि सततचा संपर्क ही त्यांची मोठी ताकद मानली जाते. गणातील प्रत्येक गावात त्यांचे आपुलकीचे संबंध असून अनेक गावांमध्ये ते “घरचा माणूस” म्हणून ओळखले जातात. सामाजिक प्रसंग, दुःख-सुखात सहभागी होणारी त्यांची वृत्ती आणि माणुसकीचा दृष्टिकोन यामुळे त्यांना सर्व स्तरांवर मान्यता मिळाली आहे.

पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी आतापर्यंत गणातील गरीब आणि गरजू जनतेसाठी अनेक शासकीय योजना पोहोचवून दिल्या आहेत. विशेषतः कृषी आणि पशुपालन क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांनी तब्बल ५०० पेक्षा जास्त सिंचन विहिरी मंजूर करून घेतल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना जलसिंचनाची मोठी मदत मिळाली. तसेच ७०० ते ८०० गायगोठे, शेळीशेड्स आणि पशुपालकांसाठी विविध योजनांचे लाभ त्यांनी मार्गी लावले आहेत.

येणाऱ्या काळात गणात घर तिथे शासकीय योजना 100 टक्के देऊ असे ते म्हणाले. 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना पंचायत समिती मार्फत सगळ्या गणातील घराघरात पोहच करू असे त्यांनी आश्वासित केले

आहे.त्यांच्या या विकासदृष्ट्या कार्यामुळे टाकळी खंडेश्वरी गणातील नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास अधिक दृढ झाला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्याची त्यांची तत्परता, विकासकामांबाबतची जाण आणि पक्षाशी असलेली निष्ठा यामुळे अजित लाळगे हे या गणासाठी भाजपचे सर्वात सक्षम आणि लोकप्रिय उमेदवार म्हणून उदयास येत आहेत.

अनेक गावांतील तरुण, शेतकरी व महिला वर्ग त्यांच्यासोबत उभा असून त्यांचा दावा भक्कम जनाधारावर आधारित आहे. विकास, निष्ठा आणि जनसंपर्काचा त्रिसूत्री पाया घेऊन लाळगे आगामी पंचायत समिती निवडणुकीत प्रभावी उमेदवारीसाठी सज्ज झाले आहेत.