मा.जिल्हा परिषद सदस्य श्रीमती लता नेटके उदमले मॅडम कोंभळी गणातून भाजपा तर्फे इच्छुक 

0
178
Google search engine

 

कोंभळी गणातून माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती लता नेटके उदमले मॅडम या मैदानात उतरणार असून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्याकडे श्रीमती.लता नेटके उदमले मॅडम यांनाच भाजपा तर्फे उमेदवारी मिळावी यासाठी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.

1992 ते 1997 या कालावधीत त्या मिरजगाव गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्या काळात त्यांनी आपल्या कार्यकुशलतेने, प्रामाणिकपणाने आणि जनसंपर्कातून गावागावांत विकासाचे नवे अध्याय रचले.तत्कालीन निवडणुकीत अंबादास पिसाळ यांना सभापती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.

श्रीमती लता नेटके उदमले मॅडम यांनी थेरगाव व परिसरातील गावांतील जनतेच्या विश्वासावर उभारलेली राजकीय कारकीर्द आजही आदर्श मानली जाते. विशेष म्हणजे 1992 साली झालेल्या निवडणुकीत थेरगाव ग्रामस्थांनी एकमुखी मतदान करून त्यांना जिल्हा परिषदेत निवडून दिले होते — ही त्या काळात संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली होती. ग्रामस्थांनी दाखविलेल्या या निष्ठेचे लता मॅडम यांनी कामाच्या माध्यमातून सोनं केलं.

त्या काळात राबविलेल्या अनेक विकासकामांमध्ये

ग्रामविकास योजनांतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, शाळा इमारतींचे बांधकाम , महिलांसाठी स्वयंरोजगार योजना आणि बचतगटांची स्थापना , शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा आणि अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता.

श्रीमती लता नेटके उदमले मॅडम यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना सद्भाव, निष्ठा आणि विकास या त्रिसूत्रीवर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून त्यांनी विकासाचा आदर्श निर्माण केला होता.

आज पुन्हा एकदा त्या कोंभळी गणातून भाजपा तर्फे इच्छुक म्हणून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत . त्यांच्या अनुभवी नेतृत्वामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते “लता उदमले मॅडम पंचायत समिती सदस्य म्हणून पाहायच्या आहेत अशी उघड इच्छा व्यक्त करत आहेत.

राजकारणात महिलांचे स्थान मजबूत करणाऱ्या आणि जनतेशी थेट संपर्क ठेवणाऱ्या श्रीमती लता नेटके उदमले मॅडम यांची वाटचाल ही सेवा आणि विकास यांचा संगम ठरली आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांचे नाव पुन्हा एकदा कोंभळी गणांत चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.