राशीन जिल्हा परिषद गटातून डॉ.विलास राऊत प्रबळ दावेदार , कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष राशीन मंडल पदी निवड झाल्याने दावेदारी मजबूत

Google search engine

 

 

राशीन जिल्हा परिषद गट हा यंदा पुरुष ओबीसी आरक्षित झाल्याने अनेक वर्षांपासून या गटात प्रतिनिधित्वाची प्रतीक्षा करणाऱ्या ओबीसी समाजासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरली आहे. या गटात भारतीय जनता पार्टीचे ओबीसी तालुकाध्यक्ष डॉ. विलास राऊत हे या एक प्रबळ, सुशिक्षित,जनसंपर्क असलेले उमेदवार म्हणून पुढे आले आहेत.डॉ. विलास नामदेव राऊत हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ता असून प्रा. राम शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांनी भांबोरा शक्ती केंद्र प्रमुख म्हणून कार्य करताना पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम केले. लोकसभा निवडणुकीत भांबोरा गटातील विविध बूथवर मीटिंग घेऊन पक्षाचे धोरण व योजनांची माहिती देत पक्षाला आघाडी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

डॉ. विलास राऊत हे सध्या भाजप ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आणि पक्ष नेतृत्वाच्या सूचनांनुसार जिल्हा व तालुका पातळीवर ओबीसी समाजाचा आवाज बुलंद केला. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा प्राधान्याने पुढे आला.

समाजकारणाबरोबरच डॉ. राऊत हे पशुवैद्यकीय क्षेत्रातही कार्यरत असून, कृत्रिम रेतन योजनेद्वारे त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मदत केली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी व सामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक शिबिरे, मोहीमा राबवल्या. कोविड काळात लसीकरण मोहिमेसाठी प्रयत्न करून अनेक नागरिकांपर्यंत केंद्र सरकारचा लाभ पोहोचवला. तसेच संजय गांधी निराधार योजना, निवृत्ती वेतन योजना यांसारख्या योजनांमध्ये नागरिकांना मार्गदर्शन केले.

सन 2017-18 मध्ये कुकडी प्रकल्पाच्या पाण्यासाठी त्यांनी तीन वेळा यशस्वी रस्ता रोको आंदोलन करून राशीन व परिसरातील गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. राशीनच्या पाणी, रस्ते, सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर नेहमीच त्यांनी आवाज उठवला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर डॉ.विलास राऊत हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक जनतेमध्येही त्यांच्या नावाबद्दल उत्साह आणि पाठिंबा दिसून येत आहे.

डॉ. विलास राऊत म्हणतात, “महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. प्रा. रामजी शिंदे साहेब यांनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यास ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. राशीन गटात ओबीसी समाजासाठी जागा राखीव झाल्याने ही आनंदाची बाब आहे. नेतृत्वाची साथ मिळाल्यास ओरिजनल ओबीसी उमेदवार नक्कीच विजयी होईल.”

त्यांनी हेही स्पष्ट केले की, “ओबीसी जागेवर इतर कोणत्याही गटातील उमेदवाराची दावेदारी आम्ही मान्य करणार नाही. नेतृत्वाचा सन्मान राखत ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हेच आमचे ध्येय आहे.”

अशा पार्श्वभूमीवर डॉ .विलास राऊत हे राशीन जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य, सक्षम आणि जनाधार असलेल्या उमेदवार म्हणून समोर येत आहेत.