
शिवसेना पक्षातर्फे कोरेगाव गणातून हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित युवक कार्यकर्ते सावता अनारसे आगामी पंचायत समिती निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या या उमेदवारीला जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले , युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेक राजेभोसले यांचे मार्गदर्शन व तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांचे नेतृत्व लाभले आहे.
सावता अनारसे हे नेहमीच गावातील युवकांना संघटित करून सामाजिक प्रश्नांवर कार्य केले आहे. युवक वर्गाचे मोठे संघटन त्यांच्या पाठीशी लाभले आहे.गावातील विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
गावपातळीवरील समस्यांची जाण आणि त्या सोडविण्याची तळमळ यामुळे कोरेगाव पंचायत समिती गणात सावता अनारसे यांचे नाव चर्चेत आहे. “८०% समाजकारण आणि २०% राजकारण” या ब्रीदवाक्याचा अंगीकार करून त्यांनी राजकारण हे सेवा म्हणून स्वीकारले आहे.
तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांनी सांगितले की, “कोरेगाव गणातील युवकवर्ग एकत्र येऊन परिवर्तन घडवेल. सावता अनारसे यांच्यासारखे समर्पित कार्यकर्तेच गावाचा विकास साधू शकतात.”
सावता अनारसे यांनी बोलताना सांगितले की, “कोरेगाव गणातील प्रत्येक नागरिकाचा आवाज पंचायत समितीत पोहोचवणे आणि सर्वसमावेशक विकास करणे हेच माझे ध्येय आहे. युवकांच्या ताकदीवर आणि शिवसेनेच्या विचारांवर मी विश्वास ठेवतो.”
आगामी निवडणुकीत सावता अनारसे यांच्या उमेदवारीमुळे कोरेगाव पंचायत समिती गणात चुरस वाढली असून, स्थानिक स्तरावर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.






