हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित, युवकांच्या ताकदीवर पुढे येणारे कुळधरण गटप्रमुख किरण कुंडलिक घालमे यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी दुरगाव गणातून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख मा. बाबुशेठ टायरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांचे नेतृत्वाखाली ते निवडणूक लढवणार आहेत.
कुळधरण गटप्रमुख किरण घालमे हे हिंदुत्ववादी विचारसरणीवर ठाम राहून त्यांनी नेहमीच गावातील युवकांना संघटित करून सामाजिक प्रश्नांवर कार्य केले आहे. युवक वर्गाचे मोठे संघटन त्यांच्या पाठीशी लाभले आहे.गावातील विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
गावपातळीवरील समस्यांची जाण आणि त्या सोडविण्याची तळमळ यामुळे दुरगाव पंचायत समिती गणात किरण घालमे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी दुरगाव गणांत मोठ्या प्रमाणात शिवसेना शाखांचा विस्तार केला आहे. “८०% समाजकारण आणि २०% राजकारण” या ब्रीदवाक्याचा अंगीकार करून त्यांनी राजकारण हे सेवा म्हणून स्वीकारले आहे.
तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांनी सांगितले की, “दुरगाव गणातील युवकवर्ग एकत्र येऊन परिवर्तन घडवेल. किरण घालमे यांच्यासारखे समर्पित कार्यकर्तेच गावाचा विकास साधू शकतात.”
किरण घालमे यांनी बोलताना सांगितले की, “दुरगाव गणातील प्रत्येक नागरिकाचा आवाज पंचायत समितीत पोहोचवणे आणि सर्वसमावेशक विकास करणे हेच माझे ध्येय आहे. युवकांच्या ताकदीवर आणि शिवसेनेच्या विचारांवर मी विश्वास ठेवतो.”
आगामी निवडणुकीत किरण घालमे यांच्या उमेदवारीमुळे दुरगाव पंचायत समिती गणात चुरस वाढली असून, स्थानिक स्तरावर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.






