कर्जतच्या सोनमाळी सायकल एजन्सीकडून नवरात्र , दसरा दिवाळी खास सवलत योजना १५ टक्क्यांपर्यंत विशेष सूट ग्राहकांना सायकल खरेदी करताना जीएसटी सवलत व कॅश डिस्काउंटचा दुहेरी फायदा

Google search engine

 

नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त ग्राहकांना आकर्षक ऑफर देत सोनमाळी सायकल एजन्सी, कर्जत यांनी भव्य डिस्काउंट स्कीमची घोषणा केली आहे. या योजनेत १५ टक्क्यांपर्यंत विशेष सूट मिळणार असून, ग्राहकांना सायकल खरेदी करताना जीएसटी सवलत व कॅश डिस्काउंट चा दुहेरी फायदा होणार आहे.

 

एजन्सीचे संचालक गोविंद सोनमाळी यांनी सांगितले की, ही योजना २ ऑक्टोबर २०२५ पासून २२ ऑक्टोबर २०२५ म्हणजेच दीपावलीपर्यंत लागू राहील. “ग्राहकांना सर्वाधिक परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण व खात्रीशीर सायकली उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे,” असे ते म्हणाले.

 

या एजन्सीकडे हिरो, ए-वन, नोवा यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या सायकलींसह जिम्मी, डॅश, वॉकर, झोके, पाळणे आणि किड्स सायकली देखील उपलब्ध आहेत. याशिवाय ट्यूब, टायर, ब्रेक, पॅडल, पंप आणि विविध अॅक्सेसरीज यांचा देखील समावेश असून, एकाच छताखाली सायकलीशी संबंधित सर्व साहित्य मिळणार आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी एजन्सीचे ठिकाण बाजारतळ, कर्जत येथे असून, अधिक माहितीसाठी ९८६०६०१०१० / ९४२०३०३३०३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.