वाघवस्तीतील शिव शंभो तरुण मंडळाकडून नवरात्र उत्सवात पायी ज्योत परंपरा कायम , आज पायी ज्योत आणण्यासाठी शिवशंभो तरुण मंडळ , वाघवस्ती सज्ज

0
333
Google search engine

कर्जत तालुक्यातील वाघवस्ती येथील शिव शंभो तरुण मंडळ यावर्षी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सलग २१व्या वर्षी पायी ज्योत आणण्याची परंपरा उत्साहात साजरी करणार आहे अशी माहिती पंकज वाघ , अध्यक्ष शिव शंभो तरुण मंडळ वाघवस्ती कर्जत यांनी दिली.

गेल्या २० वर्षांपासून हे मंडळ नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करत असून, तरुण मंडळी मोठ्या संख्येने यात सहभागी होतात. यावर्षीची खासियत म्हणजे जगदंबा देवी श्री क्षेत्र कुळधरण येथून पायी ज्योत आणली जाणार आहे.

ही पायी ज्योत यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडत असून, संपूर्ण वाघवस्ती परिसरात उत्सवाचा माहोल निर्माण होतो. तरुणांच्या सहभागामुळे या मंडळाच्या कार्याला विशेष ओळख मिळाली आहे.

वाघवस्तीकरांसाठी हा उत्सव म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रतीक ठरत आहे.