
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता (SET) परीक्षेत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा. अक्षय दादा धालवडे यांनी इंग्रजी विषयात यश संपादन केले आहे.
या यशामुळे ते सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले असून, त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
प्रा.अक्षय धालवडे यांच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे, डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. राहुल गायकवाड, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. राजाराम कानडे, प्रा. रमेश थोरात यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
प्रा. धालवडे यांच्या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली असून, शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.






