येसवडीतील खडी क्रशर तात्काळ बंद करण्यासाठी ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू 

Google search engine

 

 

कर्जत तालुक्यातील येसवडी येथे सुरू असलेल्या खडी क्रेशरमुळे शेती, जनावरे आणि आरोग्य, यावर दुष्परिणाम होत असल्यामुळे हे खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी शेतकरी व रहिवाशांनी आजपासून तहसील कार्यालय येथे उपोषण सुरू केले आहे .

या परिसरातील बहुतेक नागरिक शेती, दुग्ध व्यवसाय व इतर लघुउद्योगांवर अवलंबून आहेत. मात्र, काही जमीनदारांनी खाजगीरित्या सुरू केलेल्या खडी क्रशर व उत्खननामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ व ध्वनी प्रदूषण होते आहे. यामुळे शेती नापीक झाली असून पिकांचे उत्पादन घटले असून, अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. या भागात माळढोक आरक्षित वनक्षेत्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राणी दिसत होते. मात्र, खडी क्रशरच्या आवाजामुळे या भागात वन्यप्राणी कुठेही दिसत नाहीत यापूर्वी गावातील नागरिकांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व पर्यावरण विभागाकडे लेखी तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने आता ग्रामस्थांनी एकत्र येत सामूहिक स्वरूपात आवाज उठवत शेतकरी व रहिवासी यांनी उपोषण सुरू केले आहे या मागणीवर प्रशासनाने तत्काळ कारवाई करून गावातील पर्यावरण व शेती व्यवसायाचे संरक्षण करावे,

आज सोमवार दि. 04 ऑगस्ट रोजी सकाळी 09.00 वाजता राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरापासून भव्य मोर्चा मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे राशीन बस स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून कर्जतकडे मार्गस्थ झाला. कर्जतमध्ये आल्यानंतर पंचायत समिती कार्यालय येथून मुख्य बाजारपेठेतून मोर्चाचे तहसील कार्यालय येथे येऊन मोर्चाचे उपोषणात रुपांतर झाले.