शंभूराजे स्कूलमध्ये हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण व सर्वांत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षक पुरस्कार सन्मान

Google search engine

 

प्रतिनिधी :-प्रा.राजेंद्र खराडे 

कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील शंभूराजे पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे सुंदर अक्षर होण्यासाठी हस्ताक्षराची स्पर्धा लागावी या उद्देशाने मराठी आणि इंग्लिश हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये मराठीची इयत्ता आठवी,नववी व दहावीची हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली तर इयत्ता आठवीत इंग्लिशची हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर मराठी हस्ताक्षर स्पर्धेचे प्रत्येक वर्गातून तीन क्रमांक काढण्यात आले.त्यामध्ये इयत्ता आठवीतून प्रथम क्रमांक नंदिनी परकाळे, द्वितीय प्रगती खामकर, तृतीय संग्राम काळे तर इयत्ता नववीतून प्रथम क्रमांक अक्षरा परकाळे, द्वितीय अक्षदा सांगळे, तृतीय वैष्णवी बिबे तर इयत्ता दहावीतून प्रथम क्रमांक ईश्वरी कायगुडे, द्वितीय प्रतीक्षा खांडेकर, तृतीय प्रणव देवगिरे यांचे क्रमांक काढण्यात आले.तसेच इंग्लिश विषयातून इयत्ता आठवीतून मुलांमधून प्रथम गौरव बनकर तर मुलींमधून प्रथम संबोधी गायकवाड यांचा क्रमांक काढण्यात आला.त्यानंतर त्यांना प्राचार्य सतीश खोमणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.मराठीची स्पर्धा विषय शिक्षक म्हणून प्रा.राजेंद्र खराडे यांच्या मार्गदर्शनात झाली तर इंग्लिशची स्पर्धा विषय शिक्षिका म्हणून प्रतीक्षा जैन यांच्या मार्गदर्शनात झाली.त्यानंतर जुलै महिन्यात सर्वांत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी म्हणून इयत्ता आठवीतील संकेत काळे व इयत्ता तिसरीतील श्रद्धा पवार याचा गुलाबपुष्प देऊन प्राचार्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.त्यानंतर सर्वांत्कृष्ट कामगिरी करणारे शिक्षक म्हणून प्रतीक्षा जैन,प्रा.राजेंद्र खराडे,वैशाली भांडवलकर,नम्रता राऊत,सरिता भदोरिया यांना संस्थेच्या प्राचार्या सोनाली जोशी व प्रा.सतीश खोमणे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक प्रा.देविदास गोडसे, संचालिका मिरा गोडसे व सर्व शिक्षक,शिक्षेकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.