दुरगाव गणातून उपसरपंच मा.पप्पुभाई शेख राष्ट्रवादी काँग्रेस , शरद पवार गटामधून इच्छुक

Google search engine

दुरगावचे उपसरपंच मा.पप्पुभाई शेख दुरगाव पंचायत समिती गणातुन राष्ट्रवादी काँग्रेस , शरद पवार गटामधून इच्छुक असून त्यांनी या गणातून चाचपणी सुरू केली असून आ.रोहित दादा पवार यांनी संधी दिल्यास या गणातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या गणातील दूरगाव , वडगाव तनपूरा, नांदगाव , माळेवाडी, भोसे, रुईगव्हाण, शिंदे , कोपर्डी आदी सर्वच गावांत त्यांचा मोठा जनसंपर्क असून युवक वर्गाचे मोठे संघटन त्यांच्या पाठीशी आहे.

आ.रोहित दादा पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख असून दुरगाव ग्रामपंचायत अंतर्गत त्यांनी मोठे विकासकामे केली आहेत.

दुरगाव गणातील सुख दुःखाच्या प्रसंगी ते कायम धावून जाऊन मदत करतात. आ.रोहित दादा पवार यांनी संधी दिल्यास ते या गटातून प्रबळ दावेदार असून त्यांनी या गणातून पंचायत समितीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या गणातील सर्वच गावांत ते बैठका घेणार असून मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या पंचायत समिती गणात ते मोठी विकासकामे करतील यात कोणतीही शंका नसल्याचे त्यांच्या युवक वर्गातील समर्थकांनी सांगितले. आ.रोहित दादा पवार यांच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता.