
रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील पाटील महाविद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्त झेप फाउंडेशन मुंबई व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्ल्ड डिजिटल डेटॉक्स’ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर व झेप फाउंडेशनच्या डॉ. रेखा चौधरी याच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याची तरुणाई मोबाईलच्या प्रचंड आहारी गेली आहे. या महाविद्यालयीन तरुण पिढीला मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी, मोबाईलचा अतिरेक टाळण्यासाठी ‘एक दिवस मोबाईलचा वापर न करणे’ हा संकल्प करण्यात आला. आषाढी वारीनिमित्त डिजिटल उपवास या संकल्पनेतून या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या डिजिटल दिंडीमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. भागवत यादव, डॉ. अशोक पिसे, आयक्यूएसी प्रमुख डॉ. संदीप पै, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वर्ग व विद्यार्थी वर्ग यांनी या दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.






