साईकृपा कृषी महाविद्यालय, घारगाव येथील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या प्रथम सत्राच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र कृषी विध्यापीठे परीक्षा मंडळ द्वारे घेण्यात आलेल्या या परीक्षेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर आणि परीक्षा प्रमुख के. के. पाठक यांनी ही माहिती दिली.
विशेषतः, प्रथम वर्षाच्या निकालाची सरासरी ९६% इतकी असून, यात कुमार पवन सानप याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुमारी आदिती कडाळे हिने द्वितीय, तर कुमारी समृद्धी गोधडे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष माननीय श्री. दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव सौ. आर्चनाताई पानसरे मॅडम, संस्थेचे रजिस्टर श्री. कल्याण शिंदे सर, प्राचार्य डॉ. किशोर निंबाळकर सर आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.






