कर्जत मध्ये पहिले डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज

Google search engine

 

 

(डीटीई कोड-५६६७)

ग्रामीण भागातील विदयार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरणारी सदगुरू ग्रामविकास प्रतिष्ठानची फाळके पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कर्जत हे कर्जतमधील पहिले डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज सुरु करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे सचिव दामोदर अडसूळ सर यांनी दिली आहे.

सद्‌गुरू ग्रामविकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेंद्र (तात्या) फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल आणि आनंदराव फाळके पाटील जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स सुरु आहे. त्यात नव्याने सुरु करण्यात आलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज ची भर पडली आहे.

हे महाविद्यालय AICTE, नवी दिल्ली मान्यताप्राप्त, महाराष्ट्र शासन प्रमाणित, तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई संलग्नित आहे. कर्जत, करमाळा, श्रीगोंदा, जामखेड या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देणे हा या महाविद्यालयाचा प्रमुख उद्देश आहे.

या कॉलेज मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्कॉलरशिप सुविधा उपलब्ध आहेत. SC / ST /SBC / VJNT या प्रवर्गातील मुलांना व मुलींना १००% ट्युशन फी माफ आहे. OBC / OPEN या प्रवर्गातील मुलांना ५०% ट्युशन फी माफ आहे. सर्व प्रवर्गातील मुलींना १००% ट्युशन फी माफ आहे याची नोंद घ्यावी.

पात्रताः फक्त १० वी (SSC) उत्तीर्ण.

CET आवश्यक नाहीः कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही.

डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी डिग्री अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश घेऊ शकतात, ज्यामुळे पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस उत्तम संधी मिळते.

उपलब्धः

१. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग-566799810

२. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग – 566724510

३. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – 566729310

४. सिव्हिल इंजिनिअरिंग 566719910

प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ६० जागांची क्षमता उपलब्ध आहे.

“कोणतीही प्रवेश परीक्षा न देता आपल्या मुलाला अभियंता बनवण्याची ही उत्तम संधी आहे. सर्व पात्र विद्यार्थी व पालकांनी एकदा महाविद्यालयाला भेट देऊन ही सुवर्णसंधी मिळवावी,” असे आवाहन प्राचार्य, डॉ. भाऊसाहेब अनारसे यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क साधावाः 7743811247