साईकृपा कृषी महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Google search engine

 

श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान, संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, संलग्न साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथे आज दि. २१ जून रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी साईकृपा कृषी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निंबाळकर सर अध्यक्ष स्थानी होते व श्रीगोंदा तालुक्यातील योग प्रशिक्षक मा. श्री लक्ष्मण निवृत्ती मोरे सर यांनी योग दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी व मानवी जीवनातील योगाचे महत्त्व पटवून सांगितले आणि जगभरात २१ जून हा दिन आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीतील अमूल्य देणगी असलेला योग आज संपूर्ण जगाने स्वीकारला आहे. तन, मन आणि आत्मा याचा समतोल ही शास्त्रीय पद्धत आज केवळ आरोग्यासाठी नव्हे. तरी मानसिक शांतीसाठीही अत्यंत आवश्यक ठरते आहे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रार्थना, प्रारंभिक कृती, योगासने, प्राणायाम व मेडिटेशन, इत्यादी क्रियांचे प्रात्यक्षिक सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी बंधू भगिनींच्या समवेत विद्यार्थ्यांनी उत्साहात सादर केल्या.

समाजातील गरजू व्यक्तींना निरामय आरोग्यासाठी योगासने व सकस संतुलित आहार विषयक मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे जेष्ठ शिक्षक व योग सल्लागार मोरे सर यांनी उत्साह पूर्ण वातावरणात व्यायाम प्रकार सादर केले आणि विद्यार्थ्यांनी आनंदाने योगासने करून आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा हा भाग करण्याचे आश्वासन दिले. त्यांना उद्याचा शिस्तप्रिय नागरिक घडवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री दत्तात्रय पानसरे साहेब अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ यांनी प्रयत्न केले जात असल्याबाबतचे महत्वपूर्ण प्रतिपादन केले.

या नावीन्यपूर्ण उपक्रमात सहभाग घेऊन मा.श्री भगवान आबा पाचपुते, व्हाईस चेअरमन, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना, तसेच मा. श्री. बाळासाहेब नाहाटा, मा. सभापती, महाराष्ट्र राज्य बाजार समिती, डॉ. निंबाळकर सर, डॉ.निंबोरे सर, गलांडे सर यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले.

उद्याची भावी पिढी केवळ सुशिक्षित न बनवता त्यासोबत सुसंस्कारित शिस्तप्रिय आणि निरोगी बनवण्यासाठी महाविद्यालय करीत असलेल्या प्रयत्ना बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री दत्तात्रय पानसरे साहेब, सचिव आदरणीय अर्चनाताई पानसरे मॅडम तसेच संस्थेचे रजिस्टार श्री कल्याण शिंदे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निंबाळकर के. एच. यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.