इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी, साकत चा प्रथम वर्ष डी फार्मसीचा उत्कृष्ठ निकाल 

Google search engine

इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी, साकत चा प्रथम वर्ष डी फार्मसीचा उत्कृष्ठ निकाल

चेतना सेवा संस्था संचलित इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी, साकतच्या प्रथम वर्ष डी फार्मसी विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने डी फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा मे 2025 मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी साकतचा डी फार्मसी प्रथम वर्ष निकाल 100 टक्के लागला आहे.यामध्ये प्रथम क्रमांक रेश्मा आंधळे , द्वितीय क्रमांक नाजीम शेख , तृतीय क्रमांक राहुल पवार , चतुर्थ क्रमांक सुबोध दौंड यांनी पटकावला.इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी , साकत या महाविद्यालयात मे 2025 पासून कॉलेज ला परीक्षा केंद्र मंजूर झालेले आहे. या कॉलेज मध्ये जामखेड, कर्जत पाटोदा, कर्जत, ,श्रीगोंदा , करमाळा व बीड परिसरातील विद्यार्थी प्रवेश घेतात गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी घडविणे हेच संस्थेचे लक्ष आहे. जामखेड पासून हाकेच्या अंतरावर असलेले हे महाविद्यालयामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे प्राध्यापक यांचे संस्थेचे अध्यक्ष , सचिव, प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे.

 

प्रथम वर्ष डी.फार्मसी ऍडमिशन सुरू झाले असून अधिक माहितीसाठी संपर्क

मो.नंबर 7709778776 , 9130760106 , 8329876444 , 9075915450